दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । सातारा । विद्रोहाचा धागा हा प्रेमाचा असतो. द्वेषाचा नसतो. प्रेमाची ताकद विद्रोहात आहे. आणि त्यामुळेच परस्परात प्रेम वाढवणे , सलोखा निर्माण करणे हाच विद्रोही चळवळीचा मुख्य भाग असल्याचे प्रतिपादन पुणे येथे होणाऱ्या चौदाव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी सातारा येथे बोलताना केले.
चौदाव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ भारत पाटणकर यांचा सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहू सभागृहात कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते कॉ एडवोकेट सयाजीराव पाटील यांच्या हस्ते घोंगडी , काठी व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. त्याला डॉ. भारत पाटणकर उत्तर देत होते.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ सातारा जिल्हा शाखा व सातारा येथील पुरोगामी संघटनांच्या वतीने सत्कार चा कार्यक्रम आयोजित केला होता. विचारमंचावर जयंत उथळे , प्रा डॉ. आर. के. चव्हाण , विजय मांडके आदी उपस्थित होते.
दुःख मुक्त समाज निर्माण करण्याचा तसेच नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न तथागत गौतम बुद्धाच्या काळापासून सुरू झालेल्या विद्रोही
परंपरेपासून सुरू आहे आणि बुद्ध महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसवांना पेरियार वारकरी संत यांनी निर्माण केलेल्या विद्रोहाच्या खांद्यावर आजची विद्रोही उभी आहे असे सांगून डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की मी विद्रोही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार आजच्या आजच्या विद्रोहींनी केला पाहिजे व ते करतील असा माझा ठाम विश्वास आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कॉम्रेड सयाजीराव पाटील यांनी तरुण पिढीने विद्रोही विचार पुढे नेणे काळाची गरज आहे असे सांगितले आणि या संमेलनास शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्रोहीच्या स्थापनेपासून असलेल्या जयंत उथळे यांनी स्थापनेपासूनच्या आत्तापर्यंतच्या काळाचा आढावा घेतला.
प्रास्ताविक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी केले सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रा. गौतम काटकर यांनी केले. सुरुवातीला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. प्रारंभी कार्यकर्त्यांनी क्रांती गीत सादर केले. यावेळी सुटा संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ आर के चव्हाण यांनी ही डॉ भारत पाटणकर यांचा सुटाच्यावतीने सत्कार केला. त्याचबरोबर बार्टीच्या निवड समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा डॉ पी.डी.कांबळे यांचा सत्कार डॉ.भारत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा गौतम काटकर यांनी सूत्रसंचालन केले. राहुल गंगावणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास एडवोकेट राजेंद्र गलांडे , बाबुराव शिंदे , प्रा डॉ सुवर्णा कांबळे , प्रा डॉ अनिल जगताप ,आरिफ बागवान , अनिल मोहिते , प्रदीप मोरे , सलमा कुलकर्णी मोरे , डॉ प्रशांत पन्हाळकर , एडवोकेट शरद जांभळे , संतोष गोटल , एडवोकेट सुचेता पवार , आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.