मठामधील दानपेटी चोरट्यांनी मंदीरा बाहेर आणून कुलुप तोडलेले दिसत आहे.
स्थैर्य, विडणी, दि. ३१ : विडणी येथिल शिवाजी महाराज समाधी मठामध्ये राञी मंदीराचे कुलुप तोडून चोरट्यांनी दान पेटीतील अंदाजे चार ते पाच हजाराची रोकड घेऊन पोबारा केला.
या बाबत घटनास्थळा वरुन मिळालेली माहीती अशी की विडणी येथिल शिवाजी महाराज समाधी मंदीर मठामध्ये राञी १२ वा.सुमारास बंद असणार्या मंदीराचे कुलुप तोडून चोरट्यांनी मंदीरात प्रवेश केला असता कुञ्यांनी भोंकून कालवा केल्याने मठाशेजारी राहत असलेले जयवंत कर्वे हे जागेहोऊन घराच्या खिडकीतून कुञे का भोगतायत म्हणून पाहत असताना त्यांनी मठामध्ये चोरटी घुसल्याचे लक्षात आले त्यानंतर जयवंत कर्वे यांनी आसपासच्या लोकांना मोबाईलवर फोन करुन चोरटे मंदीरात आले असल्याचे सांगून त्यांना मदतीसाठी मठाकडे बोलविले. आसपासचे नागरिक गाडीवर आले असता. चोरट्यांनी दान पेटीतील अंदाजे चार ते पाच हजाराची रोकड घेऊन पोबारा केला.
त्यानंतर पोलिस पाटील धनाजी नेरकर यांना घटने बाबत कल्पना दिली.पोलिस पाटील नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत याची माहीती दिल्यावर सकाळी ग्रामीण पोलिस ठाणेचे पी एस. आय. जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहीती घेतली तपासा बाबत डि.बी.चे पथक पाचारण करुन त्यांना सूचना करणेत आल्या.
या बाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत जयवंत नारायण कर्वे वय ४० यांनी तक्रार दाखल केली आहे.