
स्थैर्य, सातारा दि. 4: भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनानिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी शिक्षक दिनांच्या दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षणक्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो, कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर तसेच भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दुख:द निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असल्याने जिल्हास्तरावर होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हापरिषद शिक्षण विभागाकडून एका पत्रकान्वये कळविण्यात आली आहे.