झैनबिया स्कूल, कटफळ येथील विद्यार्थ्यांचा शपथविधी समारोह उत्साहात संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । बारामती । गुरुवार दि. २१ जुलै २०२२ वार गुरुवार रोजी झैनबिया स्कूल, कटफळ,ता.बारामती येथील शालेय समूहातील विविध विद्यार्थी प्रतिनिधीचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. शालेय व्यवस्थापनातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तसेच सामाजिक भान रुजवण्याचे कार्य झैनबिया स्कूलमध्ये परंपरागत पार पाडले जाते. त्यांचा एक भाग म्हणून शाळेमध्ये चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या निवडणूक प्रक्रियेतून विविध प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बारामती ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद मोहिते सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. श्री. मोहिते सरांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून केले. अँड.अभिजित जगताप, निंबाळकर सर, श्री. मोहिते सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅच देऊन गौरविण्यात आले आणि त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक वाटचालीची शपथ त्यांना देण्यात आली व अशाप्रकारे शाळेच्या प्राचार्या यांच्या मार्गदशनाखाली, शिक्षकांच्या व्यवस्थापनाने, पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


Back to top button
Don`t copy text!