दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक प्रल्हाद चव्हाण यांच्या उमेदवारी फलटण शहरातील जबरेश्वर मंदिर येथे असणाऱ्या अमरज्योती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये पाठिंबा देताना फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, शुक्रवार पेठ गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष योगेश उर्फ सनी शिंदे, अजिंक्य गायकवाड, अक्षय आहेरराव, कालिदास अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमर ज्योती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अध्यक्ष रोहित सपकाळ (नाना), सूरजभैय्या जगताप, उध्दव जगताप, जित जगताप, आदित्य कुलकर्णी, कुणाल कांबळे, अमन बागवान, इम्रान मुलाणी, दया लकडे, विशाल चव्हाण, विश्वनाथ चोरमले, साजिद कुरेशी, मुबिन पठाण, सत्यम मोरे तसेच मंडळाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला असून आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष अर्थात राजे गटाच्या सोबत कार्यरत राहणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली आहे.