शेअर बाजारात सलग १० व्या दिवशी तेजी


 

स्थैर्य, मुंबई, दि. १४ :वित्तीय क्षेत्राच्या पुढाकारामुळे
आज शेअर बाजाराने सलग १० व्या दिवशी दिवसभर पिछाडी घेत अखेरीस बुल रन स्थिती दर्शवली.
अखेरच्या तासात बाजाराने विशेष गती घेतली. निफ्टी ५० ने दुपारी २ वाजेनंतर ११० अंकांची
वृद्धी घेतली व तो ०.३१ टक्क्यांची वृद्धी घेत ११,९७१ अंकांवर स्थिरावला. तर सेन्सेक्सने
या काळात ३८७ अंकांची वृद्धी घेतली व बाजार बंद होताना तो ०.४२ टक्क्यांच्या वृद्धीसह
४०,७९४ अंकांवर स्थिरावला.

एंजल
ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह
यांनी सांगितले की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मोरॅटोरियम प्रकरणी अनुकुल निकाल दिल्यानंतर
बँकिंग स्टॉक्स वधारले. गूड२ निकालामुळे बँकिंग स्टॉक्सवरील विश्वासावर भर पडली. परिणामी
बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.

टॉप
गेनर्स:
सेन्सेक्समधील नफ्याचे नेतृत्व बजाज फिनसर्वने ३.८७%
ने तर बजाज फायनान्सने ३% नी केले. त्यानंतर आयसीआयसीआय बँक (२.६९%), इंडसइंड बँक
(२.३४%) आणि एसबीआय (२.२५%)चा क्रमांक लागला. तर दुसरीकडे निफ्टी-५० मध्ये बजाज फिनसर्व
(३.९६%), एसबीआय लाइफ इन्शुरन्स (३.०६%) आणि बजाज फायनान्स (३.०४%) हे अग्रेसर होते.
एलअँडटी (२.०९%), टाटा स्टील (१.९५%) आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (१.८९%) हे सर्वाधिक लाभदायकांपैकी
ठरले.

टॉप
लूझर्स:
निफ्टीमध्ये नुकसानीत विप्रोने सर्वाधिक घाटा पत्करला.
आजच्या व्यापारात कंपनीचे स्टॉक्स ६.७८% नी घसरले. एनटीपीसी, ओएनजीसी, कोल इंडिया आणि
पॉवर ग्रिडवेअर हेदेखील बाजार बंद होताना अनुक्रमे ४.३%, ३.०४%, २.९% आणि २.१२% नी
घसरले. ते सेन्सेक्समध्येही टॉप लूझर्स ठरले. टेक महिंद्रा (२.१३%), इन्फोसिस (१.८९%),
आणि एचसीएल टेक्नोलॉजीज (१.१५%) यांनी आयटी क्षेत्रानंतर घसरण अनुभवली. नेसलेने बीएसईवर
०.०१ टक्क्याची घट घेऊन स्थिरसदृश स्थिती अनुभवली.

व्हॉल्यूम:निफ्टी, विप्रो, एनटीपीसी, टाटा मोटर्स आणि एसबीआय हे सर्वाधिक व्यापार झालेले स्टॉक्स
ठरले. नेस्ले इंडिया आणि श्री सिमेंट हे गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले.

जागतिक
बाजार:
अमेरिकेकडून मिळणा-या मदतनिधीबाबतच्या अनिश्चिततेमुळे
जागतिक बाजारात उदासीनता दिसून आली. केओएसपीआय आणि एसएसई कॉम्पोसाइट अनुक्रमे ०.९४%
आणि ०.५६% नी घसरले. तर हँगसेंग आणि निक्केई अनुक्रमे ०.०७% व ०.११% ची वृद्धी घेत
हिरव्या रंगात स्थिरावले.

डॉलर
विरुद्ध रुपया:
७३.३७ ते ७३.४० च्या दरम्यान प्रचंड
प्रतिकार झेलत रुपयाने अमेरिकी डॉलरविरुद्ध ३४ पैशांची वृद्धी घेतली. रुपया अखेरीस
७३.२९ रुपये मूल्यावर स्थिरावला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!