स्थैर्य, मुंबई, दि.२०: मागील ५ सत्रांपासून सुरु असलेल्या शेअर बाजारातील घसरणीला अखेर आज ब्रेक लागला. एफएमसीजी, मेटल व फार्मा निर्देशांकांनी आज बाजारातील तेजीचे नेतृत्व केले.
निफ्टी १८६.१५ अंकांनी वधारला व १४,७०० पातळीच्या पुढे जात १४,७४४ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ६४१.७२ अंकांनी वधारला व तो ४९,८५८.२४ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १४६१ शेअर्सनी नफा कमावला, १४१८ शेअर्स घसरले तर २०० शेअर्स स्थिर राहिले.
एंजल ब्रोकिंग लिमिटेचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एचयूएल (४.५१%), एनपीटीसी (४.२४%), जेएसडब्ल्यू स्टील (३.९६%), युपीएल (३.९४%), व टाटा स्टील (३.७९%) हे निफ्टीतील गेनर्स ठरले. याउलट, टेक महिंद्रा (१.२५%), एलअँडटी (१.०१%), बजाज ऑटो (०.५१%), कोल इंडिया (०.४७%), व टायटन कंपनी (०.३५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.
क्षेत्रीय आघाडीवर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात स्थिरावले. निफ्टी एनर्जी ३% वधारला. बीएसई मिडकॅप व बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे १.३५% व ०.४१% नी वधारला.
इक्रा लिमिटेड: इक्राचे शेअर्स २०% नी वाढले व त्यांनी ३,३४४.२५ रुपयांवर व्यापार केला. ब्लॉक डील्सद्वारे पीपीएफएएस अॅसेट मॅनेजमेंटने रेटिंग एजन्सीमध्ये २% पेक्षा जास्त स्टेक घेतले.
भारत डायनॅमिक्स लि.: भारत डायनॅमिक्सने नुकतेच सुरक्षा मंत्रालयासोबत १,१८८८ कोटी रुपयांच्या ४,९६० अँटी टँक मिसाइल्सचा करार केला. तो रिपीट ऑर्डरनुसार करारबद्ध झाला. त्यानंतर फर्मचे स्टॉक्स १.१३% नी वाढले व त्यांनी ३४५.८५ रुपयांवर व्यापार केला.
अदानी एंटरप्राइजेस लि.: फर्म आयपीओमार्फत ५,००० कोटी रुपयांचा फंड उभारण्याचे आयोजन करत आहे. याद्वारे कंपनी अदानी ग्रुपअंतर्गत सातवी लिस्टेड फर्म बनेल. फर्मच्या स्टॉकमध्ये १.६६ टक्क्यांनी वाढ झाली व तिने ८८५.५० रुपायंवर व्यापार केला.
आरती ड्रग्स लि.: आरती ड्रग्सच्या स्टॉ्क्समध्ये ९.०३ टक्क्यांनी वाढ झाली व त्यांनी ७४५.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने ६,००,००० पर्यंत फुल पेड अप इक्विटी शेअर्स खरेदी करण्याचे मान्य केले. कंपनीचे फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या एकूण संख्येच्या ०.६४ टक्केचे प्रतिनिधीत्व याद्वारे केले जाईल.
भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने काहीशी घसरण घेतली. ७२.५८ रुपये एवढ्या घसरणीसह ओपन झालेल्या रुपयाचे मूल्य ७२.५१ वर स्थिरावले.
जागतिक बाजारात कमकुवत संकेत: जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याच्या चिंतेने जागतिक बाजार लाल रंगात स्थिरावले. नॅसडॅक मागील सायंकाळी ३.०२ टक्क्यांनी घसरला. तर एफटीएसई १००० चे शेअर्स ०.६३%, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.२६% नी घसरले. निक्केई २२५चे शेअर्स १.४१%, व हँगसेंगचे शेअर्स १.४१% नी घटले.