सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, ७ : आज सलग पाचव्या दिवशी आयटी आणि वित्तीय शेअर्सच्या नेतृत्वाखाली भारतीय शेअर बाजाराने वृद्धी दर्शवली. निफ्टीने १० हजारांच्या पुढची पातळी कायम राखली. तो ०.३३% किंवा ३६.०० अंकांनी वधारला. निफ्टी १०,७९९.६५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५१% किंवा १८७.२४ अंकांनी वाढला व ३६,६७४.५२ वर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १३१२ शेअर्सनी प्रगती केली तर १५१ शेअर्स स्थिर राहिले. तर १३७४ शेअर्स घसरले. बजाज फायनान्स (७.७६%), इंडसइंड बँक (५.८६%), बजाज फिनसर्व्ह (४.४७%), इन्फोसिस (३.३९%) आणि आयसीआयसीआय बँक (३.५२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर अदानी पोर्ट्स (३.५३%), पॉवर ग्रिड कॉर्प (२.९८%), आयटीसी (२.६५%), एनटीपीसी (२.५२%), आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (२.८७%) हे निफ्टी लूझर्समध्ये समाविष्ट झाले.

देशांतर्गत इक्विटी बाजारातील व्यापार अस्थिर दिसून आला आणि भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.९३ रुपयांवर बंद झाला.

जगभरात कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांवर याचा परिणाम झाला. त्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या.

किंमतीतील लक्ष्य आणि तिमाही वितरण वाढल्याने टेस्ला इंकच्या शेअर्समध्ये १३% वाढ झाली. आजच्या व्यापारी सत्रात नॅसडॅकचे शेअर्स २.२१ % नी वाढले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जागतिक बाजारात नकारात्मक ट्रेंड दिसून आला. त्यामुळे युरोपियन बाजारातही घसरण दिसून आली. एफटीएसई एमआयबी ०.१३%, एफटीएसई १०० १.३१%, निक्केई २२५चे शेअर्स ०.४४% तर हँगसेंगचे शेअर्स १.३८% नी खाली घसरले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!