शेअर बाजारात सलग तिस-या दिवशी घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, ३१ : शेअर बाजारात आज सलग तिस-या दिवशी घसरण सुरु राहिल्याने काही बहुमूल्य समभागांमध्येही घसरण दिसून आली. निफ्टी ०.२६% किंवा २८.७० अंकांनी घसरला व ११०७३.४५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.३४% किंवा १२९.१८ अंकांनी घसरला व ३७,६०६.८९ वर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात सिपला (५.११%), ग्रासीम इंडस्ट्रिज (४.९८%), सन फार्मा (५.४६%), एसबीआय (२.४१%) आणि युपीएल (२.८४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले तर आयशर मोटर्स (२.७४%), रिलायन्स इंडस्ट्रिज (१.८४%), एचडीएफसी बँक (१.६६%), एशियन पेंट्स (१.३४%), आणि बजाज ऑटो (१.६१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. फार्मा क्षेत्राने इतर क्षेत्रीय निर्देशांकांना मागे टाकले. एफएमसीजी, आयटी आणि मेटलमध्येही हिरव्या रंगात व्यापार झाला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉकॅप हेदेखील आज सकारात्मक स्थितीत दिसून आले.

टोरेंट फार्मा लिमिटेड : २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहित आव्हानात्मक परिस्थितीतही टोरेंट फार्मा लिमिटेड कंपनीने मजबूत आकडेवारी दर्शवली. या फर्मने कोव्हिड-१९ उपचार विकासावर लक्ष केंद्रीत केले. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ९.१८% नी वाढले व त्यांनी २,६६१.४० रुपयांवर व्यापार केला.

एसबीआय : वित्तीय वर्ष २०२१ मधील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात १६% ची वाढ नोंदवली गेली. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेच्या स्टॉक्समध्ये २.४१% नी वाढ झाली व त्यांनी १९१.०५ रुपयांवर व्यापार केला.

सन फार्मा : कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत १,६५५.६ कोटी रुपयांचे थेट नुकसान झाल्याचे दर्शवलेे. तसेच कंपनीचा जून तिमाहितील महसूलदेखील ७,५८५.३ कोटी रुपये झाला. तरीही कंपनीचे स्टॉक्स ५.४६% नी वाढले व त्यांनी ५३७.८० रुपयांवर व्यापार केला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : जून तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात घसरण झाली. तसेच वार्षिक निव्वळ नफा ३१% नी वाढला. परिणामी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे स्टॉक्स १.८४% नी घसरले व त्यांनी २,०७० रुपयांवर व्यापार केला.

डाबर इंडिया लिमिटेड : कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाती पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न झाल्याचे नोंदवले. आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे शेअर्स ४.२४% नी वाढले व त्यांनी ५१२.७५ रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : देशांतर्गत इक्विटी मार्केट अस्थिर असल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ७४.८१ रुपयांचे मूल्य कमावले.

सोने : एमसीएक्सवर पिवळ्या धातूचे दर भारतात वाढले. आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमतीत वाढ झाल्याने बाजारात सोन्याचे दर वाढले. वाढत्या कोव्हिड रुग्णांमुळे जागतिक पातळीवरील आर्थिक मंदी आणि कमकुवत अमेरिकी डॉलरमुळे वृद्धीला अनुकूलता मिळाली.

जागतिक बाजार : चिंताजनक आर्थिक चित्राच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत संमिश्र व्यापारी सत्राचे संकेत मिळाले. नॅसडॅकचे शेअर्स ०.४३% नी वाढले, तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.१०% नी वाढले. तर दुसरीकडे, एफटीएसई१०० चे शेअर्स ०.०३% नी घसरले, निक्केई २२५ चे शेअर्स २.८२ % नी घसरले व हँगसेंगचे शेअर्स ०.४७% नी घसरले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!