
स्थैर्य, सातारा, दि. 12 सप्टेंबर : केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेंतर्गत 12 कोटी 50 लाख रुपये खर्चुन कराड रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक सोयी सुधारणा करून पुनर्विकासाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. परिसराचा समृद्ध वारसा व उद्योग, शेती आदींच्या पूरक विकासाचे प्रतीक असल्याचे मत कराड रेल्वे स्थानक प्रबंधक चंद्रशेखर सोनटक्के यांनी व्यक्त केले.
ब्रिटिश काळातील, सुमारे 137 वर्षांपूर्वीच्या या रेल्वे स्थानकाचे व परिसराचे रुपडे पालटले आहे. स्थानक कार्यालयाच्या इमारतीच्या भिंती रंगरंगोटी करून चित्रमय करून बोलक्या व आकर्षित केल्या आहेत.
मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रबंधक, अमृत भारत पुणे विभागाचे प्रकल्प मुख्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानकाच्या विकासाच्या योजना साकारल्या आहेत. त्यासाठी माजी खासदार ,खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. समितीचे सदस्य गोपाळ तिवारी, अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, डुबल आर्दीचे विशेष सहकार्य मिळत आहे.
विकासकामांची माहिती देताना स्थानक प्रबंधक सोनटक्के म्हणाले, पुनर्विकासाच्या कामात स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागाची सुधारणा करून आकर्षक व प्रशस्त केले आहे. पावसाळ्यात प्रवाशांच्या संरक्षणासाठी फलाट एकवर छताचे मजबुतीकरण केले आहे. शुद्ध व थंड पाण्याची सोय, पुरुष व महिलांसाठी विश्रांतीगृह केले आहे. 300 चौरस मीटर पार्किंगची सोय, जाण्यासाठी सरकता जिना, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, कर्हाड स्थानक ते गोवारे फाटा सिमेंटचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा रस्ता, ब्रीज सुधारणा, चित्रमय कर्हाड दर्शन प्रदर्शित करणे, आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे .