
दैनिक स्थैर्य । 10 एप्रिल 2025। फलटण । खोटी कथने प्रसारमाध्यमांमध्ये करून बदनामी केली. तसेच किसन नरुटे यांनी दिलेल्या आत्मदहनाचा इशार्याच्या निवेदनाची चौकशी होवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अॅड. विठ्ठल महाजन यांनी म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, फलटण वकिल संघाचा सभासद असून मी गेली 25 वर्ष प्रामाणीकपणे वकीली व्यवसाय करीत आहे. माझ्याविरोधात किसन नरुटे यांनी कोर्टातील कामकाजाबाबत आत्मदहन करीत असलेबाबतचे निवेदन दिले आहे. त्यामधील वस्तुस्थिती अशी की, फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कोर्ट नं.6 या न्यायालयामध्ये किसन नरुटे यांनी फौजदारी किरकोळ अर्ज 341/2022 हा दाखल केलेला होता. हा मुळ अर्ज दाखल करतेवेळी दुसर्या वकीलांनी दाखल केलेला होता.
त्यानंतर पक्षकारांनी वेळोवेळी कोर्टाचे कामकाज पाहण्याकरीता वकीलांची नेमणूक केलेली होती. त्यानंतर हे कामकाज माझ्याकडे वकील म्हणून आले होते. हेकामकाज प्रामाणिकपणे केलेले असून त्यामध्ये गुरुवार दि. 3 एप्रिल 2025 रोजी मी व वरील तक्रारदार हजर असताना कोर्टाने न्यायनिर्णय दिलेला आहे.
किसन नरुटे यांनी ही वस्तुस्थिती लपवून ठेवून त्यांचे वकील कोर्टात हजर नसल्याने त्यांचा अर्ज कोर्टाने काढून टाकला अशी खोटी कथने प्रसारमाध्यमांमध्ये करून माझी बदनामी केलेली आहे. तसेच वकील या नात्याने या कामकाजामध्ये काहीएक चुक नसताना माझ्या बद्दल खोटी कथने प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केली व आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे.
त्याचप्रमाणे किसन नरुटे यांनी मुंबई उच्च न्यायालय व सुप्रिम कोर्ट, दिल्ली यांच्याकडे खोट्या स्वरुपाचे बदनामीकारक अर्ज केले आहेत. या प्रकाराबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण थांबवायचे असेल त्यांनी रक्कमेची मागणी करून ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली आहे.
तरी किसन नरुटे यांनी आत्मदहनाचा इशाराबाबतच्या निवेदनाची चौकशी होवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.