दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । फलटण । लोकशाही पद्धतीने ओबीसी समाजाचे, व मराठा समाजाच्या विषयी भुमिका सभागृहात मांडत असताना कुट कारस्थान करुन भाजपच्या १२ आमदारांचे राज्य सरकारने निलंबन केले. राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली असून या सरकारचा आम्ही निषेध नोंदवत आहोत. सरकारने या आमदारांचे निलंबन मागे न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन उभे करू असे सांगून या प्रकरणात प्रसंगी न्यायालयीन लढा उभा केला जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिला.
फलटण तालुका व शहर भाजपचे वतीने भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षभरासाठी महाविकास आघाडी सरकारने निलंबन केले आहे. त्याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी तहसिलदार समीर यादव यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी अमोल सस्ते बोलत होते.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोकराव जाधव, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, युवा मोर्चाचे राज्य सहसंपर्कप्रमुख सुशांत निंबाळकर, नगरसेवक सचिन अहिवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदिप जाधव, व्यापारी आघाडीचे वसीम मणेर, किसान मोर्चाचे अध्यक्ष नितीन वाघ, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितिन वाघ, युवा निलेश चिंचकर, लतीफ तांबोळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.