दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | फलटण | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिलेला आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. जर आगामी काळामध्ये राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कमी केले नाहीत तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन उभारणार आहे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिलेला आहे.
फलटण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य सरकारने पेट्रोल डिझेल चर्चा दर कमी करावेत यासाठी फलटणचे तहसिलदार समीर यादव यांना सविस्तर निवेदन देण्यात आलेले होते. युवा नेते व स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.