राज्य सरकारतर्फे “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचे आयोजन

एप्रिलपासून प्रारंभ; राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी पाच कोटींचे बक्षीस


स्थैर्य, 20 मार्च, सातारा : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व सुदृढ करण्यासाठी राज्य सरकारतर्फे एप्रिलपासून ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गावपातळीवर आरोग्य आणि स्वच्छतेबाबत सकारात्मक स्पर्धा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींचे तब्बल ५९ निकषांवर सखोल मूल्यांकन केले जाणार आहे.
७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्यसंपन्न ग्राम’ म्हणून घोषित करण्यात येणार येणार असून ग्रामीण गावांना या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी ग्रामपंचायतींसाठी करणाऱ्या आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. या करण्याचा मुख्य भर प्रतिबंधात्मकअभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतस्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या कामाचे नियोजन, संनियंत्रण आणि पारदर्शक पद्धतीने गुणांकन करण्याची जबाबदारी पार पाडतील. जेणेकरून पात्र गावालाच पुरस्कार मिळेल. पात्र ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.
या निकषावर काम करावे लागणार
या योजनेत सहभागी झाल्यानंतर ग्रामपंचायतींना विविध निकषांवर काम करावे लागणार आहे. यामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, कुपोषण निर्मूलन, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, तसेच नागरिकांची जीवनशैली या सर्व घटकांचा यात समावेश असेल.आरोग्य उपाययोजना आणि सुदृढ जीवनशैली विकसित करण्यावर असणार आहे. ग्रामपंचायतींनीसक्रिय सहभाग घेतल्यास गावात स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि जनजामृतीचा दर्जा उंचावण्यासमोठी मदत होईल.
गावातील प्रत्येक ग्रामस्थाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे हा याचा मुख्य हेतू आहे, तसेच ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन कुपोषण आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायती ५९ निकषांच्या आधारे होणाऱ्या मूल्यमापनात ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवतील, त्यांनाच ‘आरोग्यसंपन्न ग्राम’ म्हणून अधिकृतरीत्या घोषित केले जाईल. हे मानांकन मिळवणे ही संबंधित गावाची आणि ग्रामपंचायतीची आरोग्याच्या बाबतीत मोठी उपलब्धी मानली जाईल.


Back to top button
Don`t copy text!