
दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना, महिलांना, शेतकरी वर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. विशेषतः सर्वसामान्यांसाठी महात्मा फुले योजनेबद्दल पाच लाखापर्यंत मोफत औषधोपचाराची केलेली व्यवस्था ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी दिलेल्या एका पत्रकाद्वारे केले आहे.
अनुप शहा यांनी अर्थसंकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया देताना पत्रकात म्हटले आहे की, फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी केलेली अर्थसंकल्पातील तरतूद ही फलटणच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना आलेले हे यश आहे. तसेच निरा-देवघर कालव्याचे काढलेले परिपत्रक हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ते यश आहे, अशी प्रतिक्रिया अनुप शहा यांनी दिली आहे.