देशाच्या उद्योग विश्वाचा तारा निखळला; रतन टाटा यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२४ | मुंबई |
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (दि.९) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरू असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.

देशासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा, शालिन उद्योगपती आपल्यातून गेला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योग समूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरूप रतन टाटा यांचं होतं. टाटा उद्योग समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी रतन टाटा यांच्या निधानाचे अधिकृत वृत्त दिले आहे.

सगळ्यांनीच त्यांच्यामध्ये देव पाहिला – युवा उद्योजक अर्जुन देशपांडे
दोन दिवसांपासून मी रतन टाटा ज्या रुग्णालयात होते, तिथेच आहोत. त्यांना लवकरात लवकरच बरं वाटावं अशा प्रार्थना आम्ही करत होतो. आम्ही सगळ्यांनी त्यांच्यामध्ये देव पाहिला होता. माणुसकी काय असते हे त्यांनी दाखवून दिलं होतं’, अशी प्रतिक्रिया युवा उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी एबीपी माझाला दिली आहे.

कसे होते रतन टाटा?
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून १९६१-६२ मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. १९९८मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ’इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही त्यांना सूचली.

टाटांच्या मार्गदर्शनात २००८ मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी २०१२ मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिली आणि सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर २०१६ मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही ३ मुले आहेत.


Back to top button
Don`t copy text!