निवडणुकीच्या कामावर असलेल्या ‘एसएसटी’ पथकाची सालपे घाटात अपघातग्रस्तांना मदत

प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले अभिनंदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२४ | फलटण |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूककामी आज ‘एसएसटी’ पथक कर्तव्यावर असताना सालपे घाटातून जाताना घाटामध्ये एका चारचाकी गाडीचा अपघात झाला होता. या ठिकाणी अपघातग्रस्तांना कोणाचीही मदत न मिळत नव्हती. हे लक्षात येताच एसएसटी पथकातील निवासी नायब तहसीलदार फलटण सावंत मॅडम, जाधववाडीचे तलाठी श्री. योगेश धेंडे, वाहनचालक श्री. बाळासाहेब भिसे यांनी अपघातग्रस्तांना आपल्याकडील शासकीय वाहनाने वाठार स्टेशन येथील शासकीय रुग्णालयात प्रथोमपचारासाठी पाठविले. अपघातग्रस्तांवर तेथे प्रथमोपचार करून सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पोहोचविले.

फलटण तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अपघातग्रस्तांना मदत करून एक संवेदनशीलता दाखवली. याबद्दल फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सर्व अधिकार्‍यांचे व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!