बेशिस्त नागरिकामुळे सातारा जिल्हयात वाढतोय कोरोनाचा फैलाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १३ : राज्याच्या कोरोना यादीत सातारा जिल्हयाचा 12 वा क्रमांक लागला आहे. हे विदारक चित्र पाहाता याची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी घेतली आहे. त्या दृष्टीने त्यानी नुकतीच एक तातडीने बैठक घेवून जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हयातील कोरोना बांधीताची वाढती आकडेवारी बरोबरच रुग्ण मूत्यूचे प्रमाण हि दिवसेदिवस वाढत आहे. हि चितांजनक परिस्थिती बदलण्यासाठी नव्याने प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बांधीताच्यासंख्येत मोठयाप्रमाणात वाढ होत आहे. आजपर्यत बाधीताचे प्रमाण हि 1746 पर्यत पोहचले आहे. यामध्ये ग्रामीण भागात अधिक जेार असल्याने दिसून येत आहे. यामध्ये कराड शिरवळ खंडाळा वाई अदि भागाचा अधिक समावेश आहे. आतापर्यत कोरोना मुळे 65 जणाचा मूत्यूची नोंद झाली आहे. नजीकच्या काळात हि संख्या वाढण्याची भिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रसार जिल्हयात झपाटयाने होत असल्याने सर्व जिल्हाविसियाना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन याबाबत अधिक जागृत झाले असून याबाबतच्या कठोर उपाययोजन लागू करण्यासाठी सक्रिय झाले आहे. कोरोना वाढता फुैलाव व त्यावर नियत्रंण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम केला जात आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे सातारा जिल्हयाच्या येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्हयाची आरोग्य यंत्रणा व शासकीय यंत्रणा पुन्हा जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सुमारे तीन महिन्यापूर्वी सातारा जिल्हयाची कोरोनाचा एकही संशयित रुग्न आढळून आला नव्हता एवढेचे नव्हेतर राज्यात व देशात कोरोना विषाणूने थैमान घालून हि तिसर्‍या  लॉकडाऊन पर्यत साातारा जिल्हयातील कोरोना बांधीताची संख्या जिल्हाप्रशासनाच्या नियंत्रणात  होती. परंतू तिसर्‍या लॉकडाऊनंतर पुणे मुंबई व अन्य राज्यातून जवळपास तीन लाखाच्या संख्येत जिल्हयात प्रवेश केलेल्या नागरिकामुळे कोरोनाचा विस्तार मोठयाप्रमाणात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हि भयावह परिस्थिती पाहाता पुन्हा सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते व जिल्हाअधिकारी शेखर सिह यांना याबाबत कडक धोरण अवलबले आहे. नियम न पाळणाऱ्यांवर सक्तीने कारवाई केली जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याचा निर्धार करीत सर्व पातळीवर यंत्रणा आता त्यानी कामाला लावली असल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहे. विशेषता नागरिकाचा आरोग्य विषयक अधिक जागृता करीत जिल्हा रुग्नालयात कोरोना तपासणी कक्ष स्थापना करुन तो अधिक प्रभावी व गतीमान करण्यात येत आहे. जिल्हयातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून जिल्हयाचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील हि सक्रिय होऊन विविध आरोग्य विभागाशी भेटीगाठी व सुचना देत आहेत. नजीकच्या काळात या संकटावर मात करण्याचा निर्धार पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्याचे बोलले जात आहे.

चौकट -लॉकडाऊन शिथिलतेनंतर सगळीकडे सुनसान असलेले वातावरण संपुष्टात येवून रस्त्यावर जिकडेतिकडे वाहने व नागरिकाची झुंबडच पाहायाला मिळाली अनेक ठिकाणी स्वंयशिस्तीचा अभावाबरोबरच फिजिक्ल डिस्टन्सिगचा फज्जाच उडला असल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिक तर खरेदीसाठी तू.तू में में करीत  असल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे परिणामी कोरोनाचा धोका वाढत आहे. जिल्हयातील 1 हाजार 739 गावापैकी तब्बल 403 गावाना कोरोनाचा विळखा पडला आहे. अनेक कोरोना बांधीत रुग्न मूत्यूमुखी पडत असल्याने जिल्हाप्रशासनाची आता डोकेदुखी वाढली आहे.

श्रीरंग काटेकर सातारा 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!