प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ला ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘’संविधांनाच्या स्वप्नातलं गाव’ या कवितासंग्रहास प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ या कवितासंग्रहास कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान समारंभ रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथील मिनी सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे . दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह डॉ.विनोद कांबळे यांनी जाहीर नुकतेच निवड झालेल्या पुस्तकांची यादी जाहीर केली आहे. संविधानाच्या स्वप्नातला गाव कविता संग्रहास हा १३ वा पुरस्कार मिळत असल्याबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल
पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, साहित्यिकगुरुवर्य प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, उपप्राचार्य. अनिलकुमार वावरे,उपप्राचार्य डॉ.रोशनआरा शेख,उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे प्रा.डॉ.रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश दुकळे, शिविमचे माजी अध्यक्ष, डॉ.शिवकुमार सोनाळकर, प्राचार्य डॉ.जी.पी.माळी, दक्षिण महाराष्ट्र साहित्यसभेचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. अलीकडे 5 जून २०२१ रोजी त्यांच्या संविधानाच्या स्वप्नातलं गाव या कवितासंग्रहाचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते झाले होते. या कविता संग्रहास वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार,छत्रपती शिवाजी कॉलेजचा सर्जनशील साहित्य लेखन पुरस्कार,तसेच गारगोटी येथील न्यूज पेपर गंगाधर पुरस्कार, तसेच तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार, शब्दकळा साहित्य संघ मंगळवेढा यांचा काव्य पुरस्कार,श्रीरामपूर येथील प्रकाश किरण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा ललित साहित्य पुरस्कार, फलटण येथील उत्कृष्ट साहित्यसेवा पुरस्कार,सृष्टी साहित्य पुरस्कार अकोला, वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार, स्वातंत्र्यसैनिक आबक पुरस्कार, हे अकरा पुरस्कार मिळाले असून हा अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यविश्व प्रकाशनचे प्रकाशक विक्रम शिंदे, डॉ.संजयकुमार सरगडे, तारुण्यवेध संघटनेचे विशाल पोखरकर,छत्रपती शिवाजी कॉलेजचा स्टाफ,समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते, भीमराव मोरे, तुकाराम लोखंडे, शिवाजी वाघमारे, डॉ.गोरख बनसोडे, फर्गुसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.प्रकाश पवार, भिनवाडा
कादंबरीचे लेखक बाळासाहेब कांबळे, प्रा.युवराज खरात,तुषार बोकेफोडे, रोहित आवळे, प्रा.डॉ.आर.ए.कुंभार सम्यक शाक्यरत्न, मळोली , सातारयातील अश्वमेध ग्रंथालयाचे अध्यक्ष रविंद्र भारती झुटिंग,डॉ.राजेंद्र माने,मळवली गावातील हितचिंतक ग्रामस्थ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते, लुंबिनी संघ सातारा, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर,शिक्षक हितकारणी संघटना पुणे, तसेच अनेक साहित्यिक इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!