श्री कात्रेश्वर हायस्कूल च्या शिक्षकांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद : डॉ.चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कातरखटाव, दि. ०६ : ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या ब्रीद वाक्याला अनुसरून ” माझे गाव माझी जबाबदारी ” ही संकल्पना राबवत   

 येथील श्री कात्रेश्वर हायस्कूल च्या शिक्षकांनी सामाजिक बांधीलकी च्या माध्यमातून  परिसरातील कोरोना बाधित कुटुंबांसाठी केलेली जनजागृती व साहित्य वाटप कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली चव्हाण  यांनी केले.

कातरखटाव ( ता.खटाव ) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री कात्रेश्वर हायस्कूल च्या शिक्षक व सेवकांच्या वतीने कोरोना बाधित कुटुंबांना कीट वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच तानाजीशेठ बागल, उपसरपंच अविनाश बागल, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, अजित सिंहासने,शिक्षक विचार मंच चे संस्थापक राजेंद्र बागल प्रभारी मुख्याध्यापक एस.एस. खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.चव्हाण म्हणाल्या की, कातरखटाव व परिसरात पहिल्या लॉक डॉवन पासून जनतेने कडक अंमल बजावणी केली होती. तरीही कोरोनाने शिरकाव केला असला तरी ग्रामस्थांनी घाबरून न जाता मास्क,सोशिअल डिस्टन्स व काढा चा वापर करत  आपली प्रतिकार क्षमता वाढवून कोरोना ला पळवून लावावे.  कोरोनाबाधीतांची वाढती संख्या लक्षात घेत कात्रेश्वर हायस्कुल मधील शिक्षक व सेवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येक कोरोना  बधीत कुटुंबीयांच्या घरी वाफारा मशीन, सॅनिटायझर बॉटल, एनर्जी ड्रिंक, मास्क, जीवनसत्वाच्या गोळया असे शंभर कीट देत माणुसकी अजून जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.या सेवकांचा आदर्श घेत परिसरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या कुटुंबियांना मदतीचा हात व मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे  ही डॉ.चव्हाण यांनी सांगितले.

सुहास शिंगाडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले 

यावेळी  रवींद्र पाटील,अँड. नितीन शिंगाडे,  अमोल बागल, अमर भागवत, विजय हांगे, सुकुमार साबळे,इम्रान मुलाणी ,अनिता वरुडे , विद्या पाटील ,  सुप्रिया सुतार, उज्वला   हांगे , दिपमाला खोत ,शीला मंडले,धीरज दलाल ,समीर यादव, राजाराम गायकवाड, प्रकाश तिबिले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

            

कीट वाटप प्रसंगी डॉ. वैशाली चव्हाण, खोत,सुहास शिंगाडे व मान्यवर (छाया : समीर तांबोळी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!