श्री राग आणि रामभजनांनी रंगला गायनाचा सोहळा

रविवार (दि. 8) रोजी ह .भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन


सज्जनगड – अभंगवाणी सादर करताना सौ.श्रुती गोडबोले व सौ.श्रद्धा जोशी- दांडेकर .
(छाया – अतुल देशपांडे)
स्थैर्य, 7 जानेवारी, सातारा : सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या भक्तनिवासात दासनवमी उत्सवानिमित्त आयोजित संगीत व गायन सेवेत शुक्रवारची संध्याकाळ श्री रागाच्या सादरीकरणाने अतिशय सुरेल पणे सादर झाली. ठाणे येथील सौ.श्रुती गोडबोले व श्रद्धा जोशी- दांडेकर यांनी सादर केलेल्या या गायन सेवेचा प्रारंभ ..श्री.. रागाने केला. संगीत सौभद्र मधील.. कोण तुझं सांग मज गुरुराया ..अतिशय सुरेखपणे सादर केले. त्यानंतर.. राम जन्मला ग सखे,.. श्रीरंगा कमला कांता ..कोण तुज सम सां..ग कधी भेटेन वनवासी.. पालखीच्या संगे.. आज सादर होत ..अवघे गरजे पंढरपुर ..रामा रघुनंदना.. सादर झाली.

भारतरत्न स्वर्गीय लतादीदींनी अजरामर केलेल्या हिंदी भाषेतील ठुमक चलत रामचंद्र सादर करताना गायकांनी उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ..राम होऊनी राम गारे ..सादर करून कानडी भाषेतील शुक्रवारी संध्याकाळी घरी येणार्‍या लक्ष्मीसाठीचे ..भाग्यदा लक्ष्मी बारम्मा.. अगदी तंतोतंत अशा शुक्रवारच्या सायंकाळी सादर करून आपल्या गायन सेवेची सांगता ..अच्युता अनंता.. या भैरवीने केली .त्यांना तबला साथ सुहास चितळे,पखवाजावर गणेश मेस्त्री,संवादिनीवर हर्षल काटदरे,ऑर्गनवर सुशील गद्रे व व्हायोलिनवर उदय गोखले यांची साथ होती. या कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर यांचे होते.

कार्यक्रमाची सांगता समर्थ सेवा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार डॉ.अजित कुलकर्णी यांच्या हस्ते या सर्व कलाकारांना रामनामी शाल ,समर्थ प्रसाद देऊन करण्यात आला. यावेळी सर्व कलाकारांची ओळख व त्यांचा परिचय मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी अतिशय सुरेखपणे करून दिली .कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि. 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन होणार आहे. दि.8 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सौ.सावनी दातार व गोवा येथील सुभाष परवार यांचे गायन होणार असून यावेळी तबला सुहास चितळे, पखवाजावर गणेश मिस्त्री ,संवादिनीवर हर्षल काटदरे, ऑर्गन वर सुशील गद्रे व व्हायोलिन साथ उदय गोखले यांची राहणार आहे.


Back to top button
Don`t copy text!