
दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२१ । फलटण । जगामध्ये प्रामाणिक पणाचे अनेक उदाहरणे बघण्यात मिळते असेच एक उदाहरण लॉन्ड्रीवाल्या भाऊंचे…
जाधववाडी ता .फलटण येथील अक्षतरेसीडेंसी, पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील यादव लॉन्ड्री येथे भडकमकरनगर, फलटण येथील एक गृहस्थ इस्त्रीसाठी कपडे ठेऊन गेले. लॉन्ड्रीचे चालक दत्तात्रय यादव यांनी कपडे इस्त्रीसाठी घेतले असता त्यात त्यांना पंधरा हजार आढळून आले. त्या रकमेचा किंचीतही मोह न ठेवता सर्व रक्कम त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.