शिखर शिंगणापूरच्या शंभूमहादेव यात्रेस प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 01 एप्रिल 2025। सातारा । शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा गुढीपाडवा ते पौर्णिमा या कालावधीत होत असून, रविवारी शंभू महादेवाची गुढी उभा करून यात्रा उत्सवास प्रारंभझाला. साडेतीन मुहूतपैकिी एक मुहूर्त असलेल्या पाडव्यानिमित्त शिंगणापूर गावातील कावडींना पुष्कर तलावामध्ये स्नान घालण्यात आले.

त्यानंतर त्यामध्ये पुष्कर तलावाचे पाणी घेऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर धार घालून व गुढ्या उभारून यात्रेस प्रारंभ झाला.

प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी शंभू महादेव मंदिरात सालकरी, सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आली.

त्यानंतर मंदिराच्या शिखरावर गुढीउभा करण्यात आली. चैत्र महिन्याच्या प्रारंभी आज रविवारी भाविकांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले. यात्रा परिसरात लहान मोठी दुकाने लावण्याची व्यावसायिकांची लगबग सुरू झाली आहे.

बुधवारी (ता. 02 एप्रिल) चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिव-पार्वतीचा हळदी सोहळा होणार आहे, तर शनिवारी (ता. पाच) शिव- पार्वती विवाह सोहळा होणार आहे.

मंगळवारी (ता. 08) चैत्र एकादशी यात्रेचा मुख्य दिवस असून, दुसर्‍या दिवशी मुंगीघाट कावडी सोहळ्याने शिंगणापूर यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणी व वीजपुरवठा दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत तसेच देवस्थान समिती सज्ज झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!