सेन्सेक्स पहिल्यांदाच 50 हजार पार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि २१: BSE सेन्सेक्सने गुरुवारी प्रथमच 50 हजारांची विक्रमी पातळी ओलांडली. अमेरिकेत नवी राष्ट्रपती जो बायडेन यांनी सत्ता हातात घेतल्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक शेअर बाजारावरही दिसत आहे. बजाज फायनान्स, बजाज फाइनसर्व्ह, रिलायन्ससह टेक महिंद्रासारखे बाजारातील मोठ्या शेअर्समध्ये 3.68% पर्यंत वाढ झाली आहे. याआधी 23 मे 2019 रोजी सेन्सेक्सने 40 हजारांचा आकडा गाठला होता.

सेन्सेक्स सकाळी 9:56 वाजता 259 अंकांनी 50,051.22 वर व्यापार करत होता. BSE वर 2,390 कंपन्यांच्या शेअर्सचा व्यापार होत आहे. 1,470 शेअर नफ्यावर आणि 798 घसरणीसह व्यापार करत आहेत. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅपही पहिल्यांदा 198.75 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांक 68.20 अंकांनी वाढून 14,712.90 वर व्यापार करीत आहे. यामध्ये टाटा मोटर्सचा शेअर 3.31% वर व्यापार करत आहे. वाहन क्षेत्रातील तेजीमुळे निफ्टी ऑटो इंडेक्सही 1% वर व्यापार करीत आहे.

BSE सेन्सेक्स इंडेक्सची दुप्पट गती

सेन्सेक्स एका वर्षाच्या सर्वात निंचाकी स्तरापेक्षा दुप्पट पातळीवर व्यापार करीत आहे. गेल्या वर्षी 24 मार्च रोजी तो घसरून 25,638 पर्यंत घसरला होता.

इंडेक्स जून 2014 मध्ये प्रथमच 25 हजार पातळीवर गेला होता. म्हणजेच 5 वर्षांत तो दुप्पट झाला आहे.

सेन्सेक्स 2 जानेवारी 1986 रोजी सुरू करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे 1978-79 मध्ये इंडेक्सची बेस व्हॅल्यू 100 अंक होते.


Back to top button
Don`t copy text!