कोयत्याच्या धाकाने वाइनशॉप मालकासह मॅनेजरला लुटले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि. 25 : रविवारी सायंकाळी दुचाकीवरून घरी निघालेल्या वाइनशॉपच्या मालकासह मॅनेजरला कोयत्याच्या धाकाने 5 जणांनी लुटले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सुहास दगडोबा निगडे (वय 42, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी आरोपींनी दोघांच्या खिशातील रोकड व मोबाइल असा एकूण 70 हजारांचा ऐवज हिसकावून पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास निगडे आणि त्यांच्या वाइनशॉपमधील मॅनेजर संदेश कुंभार हे दोघेजण दुचाकीवरून रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अप्पर डेपोच्या पाठीमागील रोडने घरी निघाले होते. दरम्यान, अत्तार सप्लायर बिल्डिंग मटेरियलच्या दुकानासमोर आले असता, पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडविले. त्यानंतर दोघांनाही कोयत्याचा धाक धाखवून निगडे यांच्या खिशातील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाइल तर, मॅनेजरच्या खिशातील 50 हजारांची रोकड असा 70 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केला. पुढील तपास गुन्हे निरीक्षक मुरलीधर खोकले करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!