एसटी कर्मचा-यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१०: राज्यातील ९८ हजार एसटी कर्मचा-यांचा पगार झाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जुलै महिन्याचा पगार झाला नसतांना सात तारखेला होणारा ऑगस्ट महिन्याचा पगारही झालेला नाही. त्यामुळे दोन महिने एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

राज्यातील हजारो एसटी कर्मचारी आता आर्थिक संकटात सापडलेले आहेत. आधीच अनेकांना तुटपुंजा पगार असतांना आता दोन महिन्यांचा पगार न झाल्याने आता अनेकांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. त्यातच राज्यात एसटी सेवा सुरू झाल्याने पगार झाला नसतांना अनेकांना कामावरही हजर राहावे लागत आहे, याबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे आणि महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातल्या ९८ हजार एसटी कर्मचा-यांचा पगार रखडला आहे. जुलै महिन्याचा पगार झाला नसताना ७ तारखेला होणारा ऑगस्टचा पगारही रखडलाय. त्यामुळे राज्यातले हजारो एसटी कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यातच पगार झाला नसतानाही अनेकांना कामावर हजर राहावे लागत आहे. राज्यात सेवा द्यायची आहे, पण कर्मचा-यांना पगार देणे शक्य नाही, अशा अवस्थेत एसटी महामंडळ सापडले आहे. राज्य सरकारने अनुदान द्यावे आणि महामंडळाची आर्थिक कोंडी सोडवावी अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!