सातार्‍यातील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही


स्थैर्य, सातारा, दि. 19 सप्टेंबर : येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा द्यावा, यासाठी सातारा जिल्ह्यातील आमदार भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र महायुतीचे सातारा जिल्हा समन्वयक सुनील काटकर यांनी गुरुवार (दि. 18) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महोत्सवास तत्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.

यापूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शाही दसरा महोत्सवास पर्यटन व जिल्हा नियोजनमधून भरीव निधी देण्याची ग्वाही दिली आहे. याकामी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी सहकार्य केले.

सुनिल काटकर यांच्यासमवेत काका धुमाळ, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप, भाजप सोशल मीडिया जिल्हा संयोजक रवींद्र लाहोटी, प्रवीण कणसे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!