टोल माफीची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची; मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाचा खुलासा


दैनिक स्थैर्य | दि. 04 जून 2023 | सातारा | पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफीची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर MH 11 आणि MH 50 या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे टोल मुक्ती दिल्याची पोस्ट फिरत आहे. तथापि, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच सदर पोस्ट चुकीची व खोटी असून कोणीतरी खोडसाळपणे टाकली आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असेही खुलास्यात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!