
दैनिक स्थैर्य । दि.०९ जानेवारी २०२२ । सातारा । सध्या करोनाच्या काळात प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर, साबण वापरू शकत नाही. ज्या गोष्टींचे निर्जंतुकीकरण होऊ शकत नाही, त्या ठिकाणी करोना किलर हे उपकरण निर्जंतुकीकरण करण्यात मोलाची भूमिका बजावते. देशातील विविध राज्यात शासकीय कार्यालयासह खाजगी ठिकाणी आत्तापर्यंत १२ हजार ५०० ते १३ हजार करोना किलर उपकरण लावण्यात आली आहेत. महाराष्ट्रात राज्य शासनाने २५० पेक्षा अधिक उपकरणे लावली असल्याची माहिती पुणे येथील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख भाऊसाहेब जंजीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कंपनीचे कायदेशीर सल्लागार माजी सरकारी वकील विकास पाटील – शिरगावकर यावेळी उपस्थित होते.
भाऊसाहेब जंजीरे पुढे म्हणाले, सद्य परिस्थितीत करोनाचा प्रसार वाढत आहे. बाकीचं लोकांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी – अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार, लोकप्रतिनिधी, आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अशा सर्वच लोकांना करोनाची बाधा होत आहे. सरकारी कार्यालय, आस्थापना, शाळा- महाविद्यालय जे आपण सुरू करण्याचा विचाराधीन आहोत, अशा ठिकाणी पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे फक्त मोकळ्या जागेत शक्य आहे. संबंधित आस्थापना, कार्यालय, रुग्णालयामध्ये फर्निचर, कॅम्पुटर, कामकाजाच्या फाइल्स रोजच्या वापरातील खाण्याच्या वस्तू इत्यादींचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी साबण, सॅनिटायझर किंवा कुठलेही द्रव्य रसायन आपणास वापरता येत नाही आणि नेमक्या अशा ठिकाणीच करोना या विषाणूंचा प्रादुर्भाव होतो.
ते पुढे म्हणाले, वैद्यकीय शिक्षण व संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्य यांच्या पत्राद्वारे या करोना किलर उपकरणाचा वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये पृष्ठभाग मास्क, पी. पी. इ. फाइल्स, पेपर, कॅम्पुटर, प्रिंटर्स, करन्सी इत्यादींचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोरोना किलर या उपकरणाचा वापर करता येईल. हे उपकरण रेल्वे, बसेस, कार तसेच १०० ते ३००, ५००, १०००, ३०००, ६००० स्केअर फुटासाठी वेगवेगळ्या डिझाइनमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपकरणांचा वापर हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यात केला जात आहे. या उपकरणाची किंमत ७ हजार ते २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विकास पाटील – शिरगावकर म्हणाले, करोना किलर हे उपकरण अत्यंत उपयुक्त असून शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच राहत्या घरातील विषाणूंचा २४ तास नाश करतात. मात्र या उपकरणाविषयी शासन आपत्ती व्यवस्थापन कायदा समजून घेत नाही, या प्रकरणाचा पाठपुरावा करत नाही. लोकांचे जीव अथवा पैसे गेले नाही पाहिजेत, हेच हे उपकरण तयार करण्यापाठीमागचा मागचा हेतू आहे. हे उपकरण शासनाच्या आरोग्य प्रमाणपत्र खरेदी करावे, अशी आमची मागणी आहे.