दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । मुंबई । कृषी क्षेत्रात असलेल्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न स्रोताची निर्मिती करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. कृषी क्षेत्राच्या मजबूत अर्थव्यवस्था निर्मितीत अॅग्री टेक (कृषी तंत्रज्ञान) स्टार्टअपची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे नर्चर.फार्म (nurture.farm)चे सीओओ व व्यवसाय प्रमुख ध्रुव सोहनी यांनी सांगितले.
कृषी तंत्रज्ञान कंपन्या सेवांची बाजारपेठ, सेवा म्हणून शेती, शोधक्षमता आणि स्मार्ट, शाश्वत शेती यांसारख्या अत्याधुनिक साधनांद्वारे भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करून ग्रामीण कौशल्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे ग्रामीण तरुणांसाठी कृषी-आधारित गिग इकॉनॉमी वर्क मॉडेल तयार होईल. स्मार्टफोन आणि ई-लर्निंगचा फायदा घेऊन या तरुणांना प्रशिक्षित व अपस्किल, प्रमाणित आणि गिग इकॉनॉमी प्लॅटफॉर्मवर आणले केले जाते. ज्यामुळे ते शेतकरी, किरकोळ विक्रेते, समूहक आणि व्यापा-यांना सेवा देतात. ते शेतक-यांना ऑनलाइन पीक सल्ला, मशिनरी बुकिंग, उत्पादनाची सत्यता तपासणे आणि यासारख्या गोष्टींमध्ये मदत करतात.
कृषी क्षेत्रामधील महिलांचे सक्षमीकरण:
महिला दीर्घकाळापासून कृषी क्षेत्राची समृद्धता, वाढ व विकासामध्ये प्रमुख योगदानकर्ता राहिल्या आहेत, तरीदेखील त्यांच्याकडे दुर्लक्षित कर्मचारी म्हणून पाहिले गेले आहे. कृषी-तंत्रज्ञान व्यासपीठे अधिक पुढाकार घेत लैंगिक सर्वसमावेशकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची तंत्रज्ञान-आधारित व्यासपीठे अधिकाधिक महिलांना तंत्रज्ञान, डिजिटायझेशन व वित्तीय व्यवस्थापनाबाबत शिक्षित करत आणि कर्मचारीवर्गामध्ये सामील होण्यास सक्षम करत ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आणतात. याबाबत काही उदाहरणे हरियाणामधील आहेत, जेथे १०० टक्के फिल्ड फोर्समध्ये महिलांचा समावेश आहे.
ग्रामीण भारताचा गिग अर्थव्यवस्था प्रवास नुकताच सुरू झाला असेल, पण त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. ते अधिक रोजगार संधींची निर्मिती करते, कृषीमधील महिलांना शिक्षित व सक्षम करते आणि प्रबळ कृषी परिसंस्थेला चालना देते. फक्त आता काहीच काळ आहे, जेथे हा वाढत असलेला कर्मचारीवर्ग कायमस्वरूपी भारतीय कृषीमध्ये रूपांतरित होईल असा विश्वास ध्रुव सोहनी यांनी व्यक्त केला.