दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२२ । फलटण । कोथळे, शास्त्रीनगर (ता. माळशिरस) येथील ५० लोकसंख्या असलेल्या वस्तीला आजही रस्ता प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. येथे गट न. ४७४ व गायरान क्षेत्रा मध्ये शासनाने घरकुले बांधून दिले आहेत मात्र, या वस्तीकडे जाणारा रस्ता मात्र चिखलात राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा रस्ता रखडला आहे. महसूल प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करावे. अशी मागणी वस्तीच्या वतीने होत आहे.
रस्त्याच्या गैरसोयी मुळे गावापासून दूर राहिलेल्या या मंडळींना आजही दळणवळणं च्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात शाळकरी मुले, महिलांना चिखल तुडवत जावे लागते. गर्भवती महिला व वयोवृद्ध लोकांना वस्ती मधून बाहेर पडणे अवघड होते. शेतात ट्रॅकर, बैलगाडी आणणे, बि बियाणे आणणे, खत आणणे, याची अत्यंत गैरसोय होत आहे. स्वतः ची वाहने दुसऱ्या वस्तीवर लावली लागतात व शेतात पिकलेला मालं बाजारपेठेत वेळेवर जात नाही.
या वस्तीतील लोकांना उर्वरित जगाशी संपर्क साधायचा असल्यास, ओढ्या, नाल्यातून वाट शोधावी लागत असल्याचे भयानक वास्तव आहे. गेल्या ६० वर्षात जिथे रस्ताच नाही, तिथे विकासाच्या कल्पना न केलेल्या च बऱ्या. आजवर अनेक स्थानिक नेत्यांनी निवडणुकी वेळी वस्तीतील लोकांना रस्त्याची अस्वसाने दिली परंतु निवडणुकीच्या गुलाला सोबत हि अस्वसने वाहून गेल्याचे दिसत आहे.
प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून रस्त्याच्या प्रश्न वेळेवर सोडवावा व रस्ता दळणवळणासाठी खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दळणवळणाची सोय नसल्याने दूध डेयरी घरापर्यंत येत नाही, दुधाची किटली रोज १ किमी डोक्यावर घेऊन जावे लागते. गाईचे खाद्य, पोती घरी आणता येत नाहीत.
– महादेव माने, स्थानिक शेतकरी
रस्ता नसल्याने ट्रॅक्टर शेतामध्ये आणता येत नाही त्यामुळे मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत.
– विजय माने, स्थानिक शेतकरी
शाळेत जाण्यासाठी वडिलांना सायकल खरेदी करायला लावली. मात्र, रस्त्या नसल्याने सायकल घरीच ठेवून शाळेत चालत जावे लागले.
– आकाश माने, स्थानिक विद्यार्थी