भारताच्या स्वातंत्र्यचा 75 वर्षा निमित्ताने जिल्ह्यातील महत्वपूर्ण नद्यांवर साजरा झाला नदी उत्सव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । सातारा । नदी प्रदुषण आरोग्याच्या दुष्टीने वाढणारी मोठी समस्या आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी राज्य शासनाबरोबर केंद्रशासनही प्रयत्न करीत आहेत. नदी प्रदुषण कमी करण्यासाठी ग्रामपंचायत, नगर पालिकांचे सेवाभावी संस्था प्रयत्न करीत आहेत.  त्यांच्या प्रयत्नांमध्ये आपलाही सहभाग मोलाचा ठरणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत देशासह जिल्ह्यात नदी उत्सव साजरा करण्यात आला. याचा उद्देश नदीतील प्रदुषण कमी करणे हा आहे. उत्सव साजरा करण्यासाठी नद्यांची नावे व उत्सव  घेण्याचे ठिकाण निश्चित केले होते. यामध्ये महाराष्ट्रातील  कृष्णा, गोदावरी, तापी,भीमा व पंचगंगा या नद्यांचा समावेश होता. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीचा उगम क्षेत्र महाबळेश्वर व वाई येथील कृष्णा घाटावरील गणपती मंदिर या ठिकाणी नदी उत्सव साजरा करण्यात आला.

 “नदी स्वच्छता माझी जबाबदारी

मी नेहमी घेईल याची खबरदारी

कृष्णा नदीचा उगम व कृष्णा घाट गणपती मंदिर हे क्षेत्र सातारा सिंचन विभाग, सातारा यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असून नदी उत्सवाचे नियोजन करणेकरिता सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता  अशोक पवार, यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.  या उत्सावासाठी  जिल्हाधिकारी शेखर सिंह व सातारा सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,   यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच महाबळेश्वरच्या  तहसिलदार सुषमा पाटील,  वाईचे तहसिलदार रणजीत भोसले यांच्या समन्वयाने व वाई नगरपरिषद, मुख्याधिकारी किरण मोरे,  कृष्णा नदी सेवा कार्य फौडेशन , रोटरी क्लब वाई, कृष्णाई सोशल फोरम , आर्टऑफलिव्हिंग , जयहिंद फौंडेशन, एनसीसी विभाग किसनवीर महाविद्यालय   व जिल्ह्यामधील विविध सेवा भावी संस्था यांच्या विशेष सहकार्याने  नदी महोत्सव संपन्न झाला.

या महोत्सवानिमित्त वाई या ठिकाणी  17 डिसेंबर रोजी   सर्व माध्यमिक शाळांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. 18 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते  सायंकाळी  5 या दरम्यान महागणपती घाट, नाना पार्क मोकळी जागा धर्मपुरी घाट परिसर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 19 डिसेंबर रोजी   बदामी तळे परिसर स्वच्छता व भीमकुंड आळी घाट या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 20 डिसेंबर रोजी सकाळी   द्रविड हायस्कूल मैदान येथे निसर्ग पर्यावरण – वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. 21 डिसेंबर रोजी महागणपती घाट – शाहीर चौक- नगरपालिका – महागणपती घाट येथे नदी स्वच्छता व जनजागृती फेरी कार्यक्रम करण्यात आला.

22 डिसेंबर रोजी द्रविड हायस्कूल, वाई येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यकारी अभियंता अशोक पवार  यांचे नदी स्वच्छता व्याख्यान आयोजित केले होते.या मध्ये त्यांनी  पाणी जागरूकता (Water Awareness) बाबत सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी  पृथ्वीवरील एकूण जमीन व  पाणी  किती व एकूण पाण्या पैकी पिण्यासाठी योग्य पाणी किती या बाबत विद्यार्थ्यांना आकडेवारी मध्ये सविस्तर माहिती सांगितली जेणेकरून त्यांना पाणी  टंचाई  या  विषयाबाबत गांभीर्य राहील . त्या नंतर त्यांनी पाणी टंचाईची प्रमुख कारणे या बद्दल देखील सखोल माहिती दिली. त्या मध्ये प्रामुख्याने बोअरवेल खोदाई यंत्रणांचा सुकाळ आणि स्वस्तात उपलब्ध व नियमाचा अभाव , जास्त पाणी पिणाऱ्या नगदी पिकांच्या क्षेत्रात प्रचंड वाढ (ऊस, केळी इ.) , पर्जन्यमानाच्या बदलामुळे नैसर्गिक भूजल पुनर्भरणात अडचणी, बांधा-विसरा-परत बांधा “Build-Neglect-rebuild”  इ.कारणे या बाबत देखील अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली जेणेकरून त्यांना त्याचा भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. 23 डिसेंबर  रोजी  लोकमान्य टिळक ग्रंथालय, वाई  येथे    जलपूजन ,तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान ,व  बक्षीस समारंभ तसेच प्रमाणपत्र  देऊन  कार्यक्रमाची  सांगता करणेत आली.

निबंध स्पर्धेमध्ये तीन विजेते क्रमांक व  दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढून पुढील विद्यार्थ्यांना देणेत आले. कु. धम्मदिक्षा दिपक जाधव.इ.10 वी- प्रथम क्रमांक  कन्याशाळा, वाई, कु.कुंभार सृष्टी अनिल इ.10 वी.-द्वितीय क्रमांक, महर्षी शिंदे विद्यामंदिर, कु.चिकणे साक्षी विठ्ठल इ.9 वी- तृतीय क्रमांक त.ल.जोशी विद्यालय वाई, कु.घैसास श्रेया शिरीष इ-7 वी- उत्तेजनार्थ , प्रथम कन्याशाळा वाई, कु.चौधरी मनाली महेंद्र इ- 9 वी उत्तेजनार्थ द्वितीय त.ल.जोशी  विद्यालय वाई

नदी उत्सवाचा सांगता कार्यक्रम क्षेत्र महाबळेश्वर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह  उपस्थित होते. उपवन संरक्षक महादेव मोहिते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   कृष्णाई मंदिर  येथे पूजन व पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर येथे जलपूजन व दीपोस्तव करून सांगता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या नंतर जिल्हा प्राथमिक शाळा महाबळेश्वर येथे नदी उत्सवा दरम्यान घेतलेल्या निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इ.स्पर्धेचे बक्षीस वितरण करणेत आले.तसेच या उत्सवासाठी योगदान दिलेल्या सर्व विभागाच्या अधिकारी , कर्मचारी व इतर सेवाभावी संस्था यांना प्रमाण पत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह   यांनी पाणी टंचाई, पाणी बचत काळाची गरज व वाढते प्रदूषण या बाबत मार्गदर्शन केले.

स्वच्छ सुंदर नदी

स्वच्छ सुंदर परिसर

प्रत्येकाच्या आरोग्यासाठी

संकल्प करू निरंतर

पाणी हा विषय सर्वांसाठी अंत्यत निगडीचा आहे व हे सर्वांना माहिती देखील आहे परंतु कोणालाच ते उमजून घेण्यात रस नसतो. “जल हे जीवन  आहे.” हे अगदी शाळेत असल्यापासून शिकवलं जातं परंतु ते जेव्हा व्यवहारामध्ये वापरायची वेळ येते तेव्हा ही गोष्ट  सगळे विसरतात. जल हे जीवन आहे परंतु सद्यस्थितीत पर्यावरणाचा  विचार केला तर जल व जीवन  या दोन्ही गोष्टीची कमतरता भासू लागली आहे. वाढत्या प्रदुषणामुळे जीवांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाले आहेत .त्या करिता जलजागृती  व त्या अनुषंगाने जबाबदारीची जाणीव होणे गरजेचे आहे.


Back to top button
Don`t copy text!