धोका वाढतोय; कोळकीकरांनी काटेकोर नियम पाळावेत : संजय कामठे; सुविधांसाठी ग्रामपंचायत सज्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, कोळकी, दि.1 : कोळकी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासनाकडून दिनांक 8 मे पर्यंत निर्बंध वाढवण्यात आले असून संपूर्ण गाव प्रतिबंधक क्षेत्र म्हणून प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी घोषित केलेले आहे. या कालावधीत कोळकीकरांनी घरातून बाहेर पडू नये. नियमांचे काटेकोर पालन करावे. जीवनावश्यक वस्तू आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणा पूर्ण सज्ज झाली असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोळकीचे उपसरपंच संजय कामठे यांनी केले आहे.

ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रभाग निहाय कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून ग्रामस्थांनी साहित्यासाठी आपल्या प्रभागासाठी नमूद केलेल्या दुकानदारास संपर्क साधावा व साहित्य पोहोच करणेसाठी आपल्या भागात नेमून दिलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यास संपर्क साधावा, असेही कोळकीचे संजय कामठे यांनी स्पष्ट केलेले आहे.

ग्रामपंचायतीच्यावतीने प्रभाग निहाय नियुक्त केलेले कर्मचारी व किराणा माल दुकानदारांची यादी कंसात मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे –

नरसोबा नगर –
कर्मचारी : प्रसाद नंदकुमार म्हेत्रे (7720014515),
किराणा दुकानदार : आर.आर.जोशी (9730837842), प्रमोद गिरी (9623454812), राजेंद्र तेली (9890801340), सोमनाथ नेरकर (9271381493), उमेश काशिद (9284313233), जनार्दन जाधव (9763849769), सचिन टेळे (9890640292), श्रेणिक गांधी (9822038758).

सावतामाळी नगर, महादेव नगर, शेंडे / दंडिले / नाळे मळा –
कर्मचारी : सुनिल दगडू शेंडे (8482921811),
किराणा दुकानदार : निर्मला प्रकाश भुजबळ (9975282689), साई मार्ट (9284700921), हणमंत भुजबळ (9730782172)

बुवासाहेब नगर, पद्मावती नगर, नेवसे वस्ती –
कर्मचारी : रणजित किसन कचरे (7720014510)
किराणा दुकानदार : संजय व्होरा (9503790060), नितेश दोशी (8408073939), रोहन शिंदे (9766555538)

अक्षतनगर, अजितनगर, शारदानगर, पखाले मळा –
कर्मचारी : लक्ष्मण पखाले (7720014509)
किराणा दुकानदार : श्रीराम बझार (7447498474), अमोल गिरी (6332031555), विजय गिरी (9975193378), मेहता रविंद्र (8600891430), रंघवे जोतीराम (8421215890), शेंडे ज्ञानदेव (9421209105), महाराजा बझार (9422604895).

मालोजीनगर, अबदागिरेवस्ती –
कर्मचारी : किशोर काशिनाथ सातव (7720014516)
किराणा दुकानदार : देवेंद्र जंगम (8208742542), विजय सपाटे (8308724685), राजेंद्र जगदाळे (9822037547), मोहन कोरे (8975637940)

वनदेवशेरी, शिंदेवस्ती, जाधववस्ती –
कर्मचारी : अक्षय सुभाष नाळे (7720014518)
किराणा दुकानदार : किसन नाळे (9604108177), दत्तात्रय नाळे (8796941219), महेंद्र राऊत (9130570895)


Back to top button
Don`t copy text!