तबल्यातील लय व लालित्य विसावले – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख


स्थैर्य, मुंबई, दि. ०५: ” शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीताला उत्तम साथसंगत करणारे ज्येष्ठ तबलावादक पं. विनायकराव थोरात यांच्या निधनामुळे तबल्यातील लय आणि लालित्य विसावले”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंडितजींनी प्रदीर्घकाळ आपल्या नेटक्या आणि सौंदर्यपूर्ण तबलासाथीने दिग्गज गायकांचे गाणे अधिक खुलण्यास हातभार लावला होता. त्यांच्या वादनसेवेचा उचित गौरव राज्य शासनातर्फे नाट्याचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार देऊन करण्यात आला होता. त्यांच्या जाण्याने तबला साथसंगतीतील एका युगाचा अस्त झाला आहे”, असेही देशमुख यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!