दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
राष्ट्रीय समाज पक्षाच्या माढा लोकसभा अंतर्गत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक फलटण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीस प्रमुख मान्यवर राष्ट्रीय समाज पक्ष संघटक बाळासाहेब लेंगरे (मामा), प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते (नाना), मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर (माऊली), फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रभारी भाऊसाहेब वाघ (आप्पा), प्रभारी फलटण कोरेगाव विधानसभा प्रभारी खंडेराव सरक (आण्णा) यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणूक प्रभारी, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांच्या नियुक्ती देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका महिला आघाडी कार्याध्यक्षपदी सौ.संगीता शिवाजी मुळीक यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती वनिता बाबुराव बिचुकले यांची निवड करण्यात आली.
बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या माढा लोकसभा अंतर्गत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तसेच येणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व आघाड्यांवर पक्षाचे संघटन वाढवण्यावर भर देण्यावर काम करण्याचा विचार झाला. त्याचप्रमाणे पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी महिला आघाडी सक्षम करण्याच्या दृष्टीने ग्रामीण स्तरापासून ते जिल्हास्तरावर नवीन नेतृत्वाला संधी देण्यात येईल, असेही सूचविण्यात आले. पक्षाची सदस्यसंख्या वाढवणे यासह नवीन विविध मुद्यांवरती आढावा यावेळी घेण्यात आला.