म.सा.प.च्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ नोव्हेंबर २०२२ । फलटण ।  येथे दि.२५ व २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या १० व्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. त्या नुसार खुल्या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डॉ.राजेश जोशी (सातारा), द्वितीय क्रमांक सौ.सुरेखा बाबासाहेब वंजारी (देवापूर ता.माण), तृतीय क्रमांक शुभांगी दळवी (सातारा) हे विजेते घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेतर्फे घेण्यात आलेल्या उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गुंफण (मसूर), द्वितीय क्रमांक निशांत (अहमदनगर), तृतीय क्रमांक लक्ष्मीपुत्र (कराड) आणि उत्तेजनार्थ ए.व्ही.बी माझा (फलटण), रणसम्राट (सातारा) या दिवाळी अंकांनी विजेतेपद मिळविले आहे. तसेच महाविद्यालयीन उत्कृष्ट वार्षिक नियतकालिक व त्यामधील युवा साहित्यिक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे महाविद्यालयीन उत्कृष्ट वार्षिक नियतकालिक प्रथम क्रमांक ‘शिवविजय’ (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा), द्वितीय क्रमांक ‘सद्गुरू’ (सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय,कराड), तृतीय क्रमांक ‘उदय’ (मुधोजी महाविद्यालय फलटण ), उत्तेजनार्थ ‘दौलत’ (बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण), ’मैत्रयी’ सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या वार्षिक नियतकालिकांमध्ये लिखाण करणारे युवा साहित्यिक कु.मेघा गणेश शिंदे (बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण), द्वितीय क्रमांक विनय बाळासाहेब कर्चे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा), कु.नेहा बाळासाहेब देशमुख (सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड), कु.ऐश्वर्या रामचंद्र माने (मुधोजी महाविद्यालय, फलटण), ओंकार लोखंडे (प्रा.सं.कदम कॉलेज देऊर) तर युवा कवींमध्ये कु.वैष्णवी दत्तात्रय गुजर (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा) कु.निकिता विठ्ठल पवार (बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण), संकेत पोपट डांगे (मुधोजी महाविद्यालय, फलटण), कु.सानिका दीपक काटू (सा. फुले महिला महाविदयालय, सातारा), अय्याज जाफर मुलाणी (कला,वाणिज्य महाविद्यालय,सातारा) यांची निवड करण्यात आलेली आहे. वरील सर्व स्पर्धांचा निकाल स्पर्धा विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी जाहीर केला.

या पैकी महाविद्यालयीन उत्कृष्ट वार्षिक नियतकालिक व या वार्षिक नियतकालिकांमध्ये लिखाण करणारे युवा साहित्यिकांचा पारितोषिक वितरण समारंभ दि.२५ नोव्हेंबर रोजी स.११ वा.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या हस्ते तर उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण समारंभ कोषाध्यक्षा सौ.सुनीताराजे पवार यांच्या हस्ते व हे दोन्ही कार्यक्रम संमेलनाचे अध्यक्ष किशोर बेडकिहाळ व उद्घाटक माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत. तसेच खुल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि.२६ नोव्हेंबर रोजी दु.२ वा.  महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व जेष्ठ साहित्यिक संपादक व प्रसिद्ध वक्ते मधुकर भावे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व विजेत्यांनी दि.२५ व २६ नोव्हेंबर रोजी सौ. वेणूताई चव्हाण साहित्य नगरी (नामदेवराव सूर्यवंशी-बेडके महाविद्यालय) येथे पार पडणार्या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे,  प्रमुख कार्यवाह ताराचंद्र आवळे  व अमर शेंडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!