
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । सातारा । गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल दीडशे जागांचे बहुमत मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भविष्यकालीन धोरणावर आणि कार्यपद्धतीवर हा जनतेने दाखवलेला विश्वास आहे या निकालावरूनच देशाचे पुढील भवितव्य 2024 च्या निवडणुकीत निश्चितच ठरवले जाईल असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील कोयना दौलत या निवासस्थानी देसाई यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधत गुजरातच्या निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले.
देसाई पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यशैली मधून देशाची भविष्यकालीन स्थिती काय आहे हे त्यांच्या नेतृत्वगुणातून सिद्ध केले आहे पंतप्रधान मोदींचे व्हिजन आणि विचार नेतृत्व क्षमता यावर गुजरातच्या जनतेने या निकालांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या संघटनात्मक प्रयत्नाचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये भाजपला दीडशे जागांचे बहुमत मिळाले आहे हा भाजपच्या संघटन शक्तीचा विजय आहे गुजरात चा निकाल हा देशाला 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निश्चित दिशा देणार आहे 2024 च्या निवडणुकीतही असाच भाजपचा वर चष्मा दिसून येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले देशातील जनतेला अपेक्षित विकास होत असेल व राज्य देशात पुढे जात असताना देश जागतिक पातळीवर एक नेतृत्व शक्ती म्हणून पुढे येत आहे त्यामुळे मोदींच्या विचारांच्या पाठीशी जनता उभी राहिली आहे कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात हे या निकालातून दिसून आले आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची त्यांनी खिल्ली उडवली . देसाई पुढे म्हणाले कितीही कोणी यात्रा काढल्या कोणाच्या पाठीमागे राहायचा प्रयत्न केला कोणाच्या हातात हात घालून कोणी चालला तरी काही फरक पडत नाही हे या गुजरातच्या निकालाने स्पष्ट केले आहे असा अप्रत्यक्ष टोला देसाई यांनी महाविकास आघाडीच्या राजकीय चाणक्यांना लगाविला आहे.