
दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | लखिमपूर खेरी येथील ५ शेतकरयांना मंत्र्याच्या मुलाने गाडी खाली चिरडले त्या शहिद शेतकरयांचा अस्थिकलश बुधवार दि.२७/१०/२०२१ रोजी म. फुले वाडा पुणे येथून सातारा येथे मुक्कामी येणार आहे व उद्या गुरुवार दि. २८/१०/२०२१ रोजी सकाळी ९ वाजता शहिद भगतसिंग चौक, बुधवार नाका सातारा येथे स्वागत व सभा होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मारक , सातारा येथे अभिवादन व तेथून मिरवणूक काढत छ. शिवाजी महाराज पुतळा मार्गे कराडकडे रवाना होईल. अस्थिकलश यात्रा दुपारी २ ते ३ वाजता यावेळेत म.गांधी पुतळा , कोल्हापूर नाका , कराड येथे स्वागत व अभिवादन सभा होईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता जखिणवाडी (कराड) येथे शेतकरी सभा व अभिवादन कार्यक्रम होईल. तरी शेतकऱ्यांच्या विषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी जमेल तेथे सहभागी व्हावे असे आवाहन सातारा जिल्हा किसान सभेचे वतीने कॉ माणिक अवघडे यांनी केले आहे.