दैनिक स्थैर्य । दि.२५ मार्च २०२२ । मुंबई । तौक्ते चक्रीवादळात कोकणाचे फार नुकसान झाले असून रायगड जिल्ह्यातील 492 जिल्हा परिषद शाळाच्या इमारत दुरुस्तीसाठी 738 लाख रूपये इतका निधी मंजूर केला केला आहे. त्याचप्रमाणे तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यांकरिता मालमत्ता दुरुस्तीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 664.99 लाख इतका निधी राज्य कार्यकारी समितीने मंजूर केला आहे. याकरिता निकषात बसणारी सर्व मदत प्रकल्पग्रस्तांना दिली जाणार आहे. तसेच उर्वरित निधी मार्चनंतर देण्यात येईल. याकरिता केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सुनील शिंदे, जयंत पाटील, अनिकेत तटकरे, रमेश पाटील यांनी उपस्थित केला होता.