रस्ते सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी टिमवर्कने काम करावे; अपघात होणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । नाशिक ।  नुकताच शनिवारी झालेल्या बस अपघाताचे गांभिर्य लक्षात घेवून रस्ते सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी टिमवर्कने काम करून अपघात होणार नाहीत यादृष्टिने आवश्यकत्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अशा सूचना बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील विविध रस्ते, महामार्गावरील अपघात, ब्लॉकस्पॉट व रस्ते सुरक्षितता बाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रशेखर पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंखे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मालेगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे आवश्यक असून त्याअनुषंगाने अवजड वाहनांसाठी असलेल्या वाहतुक नियमांची जनजागृती करण्याकरिता टोल नाक्यांवर सातत्याने संदेशांचे प्रसारण करण्यात यावे.


Back to top button
Don`t copy text!