गिरवीच्या ज्ञानदा कदमचे गिर्यारोहणासोबतच श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील गिरवी येथील ज्ञानदा कदमने ‘गिर्यारोहना’ बरोबरच श्रीमद्भगवद्गीता पारायण तीन तासात सकाळी ६ ते ९ यावेळेत पूर्ण करून सर्वांना अचंबित केले. ज्ञानदा कदम कमी वयात अध्यात्मात सुध्दा अग्रेसर असल्याचे यातून दिसून येत आहे.

फलटण तालुक्यामधील किल्ले वारूगडच्या पायथ्याशी असलेल्या ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे ”गिरवी’ हे गाव या गावाची ओळख कायम राखत ज्ञानदा सचिन कदम हिने अवघ्या लहान वयात (वर्ष ६) ३० नोव्हेंबर २०२१ रोजी आपला हिंदूंचा धर्मग्रंथ श्रीमद्भगवद्गीताचे आळंदी यात्रा कार्तिकी एकादशीनिमित्त संस्कृतमधून 1 ते 18 अध्याय पारायण केले.

श्रीमद्भगवद्गीतेच्या तिच्या शिक्षिका जननी श्री यांच्या फेसबुक पेज वरून लाईव्ह पारायण केले व आपली स्वतःची नवीन ओळख निर्माण केली आहे.

ज्ञानदाचे राम रक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सरस्वतीस्तोत्र तोंडपाठ आहेत. ज्ञानदा कदम मुलींना एक संदेश देत आहे,

‘शस्त्र आणि शास्त्र हाती’ घ्या. शस्त्र हाती घेतल्याने मनगट बळकट होईल. आणि शास्त्र हाती घेतले तर मन बळकट होईल. मन आणि मनगट बळकट असेल तर कोणापुढेही अबला म्हणून नतमस्तक होण्याची गरज नाही आणि शास्त्र समजून घ्यायचे असेल तर संस्कृत हे आलेच पाहिजे म्हणून ती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करते की इयत्ता पहिली पासून ‘संस्कृत’ हा विषय सर्व शाळांमधून शिकवला जावा.

ती स्वतःला संस्कृत भारतीच्या माध्यमातून संस्कृत शिकत आहे.
तिने हे पारायण 3 तासात पूर्ण केले.

तिच्या या यशात आई मोक्षदा सचिन कदम वडील सचिन सोपानराव कदम यांचा सिंहाचा वाटा आहे.

त्यानी तिला मार्गदर्शन केले. ज्ञानदा कदमच्या या उपक्रमाचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!