दैनिक स्थैर्य | दि. २८ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फलटण येथे रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे ‘रजत जयंती ध्यान महोत्सव सोहोळा’ (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक अभिजीत धर्माधिकारी व प्रा. राज कदम यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात तेजज्ञान फाउंडेशनच्या नरेंद्र जोशी यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केली. त्यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे, असे समजावले. जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व पटवून देत, “हातातील मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून नकारात्म विचाराकडुन सकारात्मक विचाराकडे सकारात्मक विचाराकडुन शुभविचाराकडे वाटचाल करत निविचार अवस्थामध्ये जाण्यासाठी मनुष्य जिवनात घ्यानाचे खुप महत्व आहे. ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, ‘स्व-अनुभव’ होईल,” प्रेम, आनंद,मैन,शांती, भरपुरता, सुख समाधान प्रतेकास लाभेल असे ते म्हणाले.
कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. “मी कोण आहे?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यातून उपस्थितांना ‘स्व-अनुभव’ मिळाला.
या कार्यक्रमाला 300 पेक्षा जास्त साधक आणि नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी मनोभावे कार्यक्रमाचा आनंद घेतला. मा.श्री. अभिजीत धर्माधिकारी व मा.श्री.राज कदम यांनी आपल्या विचारांतून उपस्थितांना संबोधित केले आणि ध्यान व संपुर्णलक्ष, महाआसमानि ‘शिबीर साधनेसाठी निमंत्रण, प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार करवा यांनी रंगतदार पद्धतीने केले आणि फाउंडेशनच्या २५ वर्षांच्या प्रवासाची ओळख श्रोत्यांना करून दिली. तेजज्ञान फाउंडेशनतर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम भारतातील सुमारे 125 शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशभर ध्यानाच्या माध्यमातून शांतता आणि आनंदाचे सशक्त वातावरण निर्माण होत आहे.
कार्यक्रमाचे सत्यप्रबंधक सतिश हिप्परकर. फलटण तेजस्थानचे केअर टेकर जगदिश करवा. सेवाचार्य बबन योगे.झोनल श्रवण संयोजक योगेश जगदाळे पुस्तकाचार्य कामेन्द्रं गुरव,प्रविन ढवळे हॅपीसीटी प्रोग्रॅम संयोजक सुवर्णा विभुते,संजिवनी कदम ,प्रितीभा फडतरे ,संतोष भोसले, सनी पवार ,मनोहर नांदले समवेत २१ तेजसेवक यांनी सेवा दिली. कार्यक्रमाच्या समारोपात, जवळपास सर्व प्रमुख पाहुणे समवेत उपस्थि लोकांनी २१ दिवसांचे ध्यान चॅलेंज घेण्याचा व संपुर्णलक्ष, महाआसमानि ‘शिबीर करण्याचा संकल्प व्यक्त केला.