स्थैर्य, औंध, दि. 01 : कोरोनामुळे मुंबईहून आलेल्या लोकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाइन व्हावे लागले मात्र यावेळेचा सदुपयोग करण्याचा चंग क्वारंटाईन झालेल्या लोकांनी करीत प्राथमिक शाळेचा परीसर स्वच्छतेबरोबर शाळेला रंगरंगोटी करून शाळेचे रुप बदलून टाकले आहे.
क्वारंटाईन केलेल्या लोकांनी जिल्हा परिषद शाळेचा परिसर स्वच्छ केली. तसेच शाळेच्या समोरील बागेतील झाडांचा पडलेला पालापाचोळा गोळा केला. शाळेला सुट्टी असल्याने झाडांना पाणी मिळत नव्हते मात्र या झाडांची बागेतील स्वच्छता करून त्यांना पाणी देऊन देखभाल केली. क्वारंटाईन झालेले काही तरुण मुंबईत रंगकाम करतात. त्यामुळे त्यांनी क्वारंटाईन काळात शाळा रंगवण्याचे काम हाती
शाळेच्या खोल्या रंगवून झाल्यामुळे दुरावस्था झालेल्या शाळेचे रुप पालटले आहे. महामारीच्या संकटात शाळेत मुक्काम करावा लागला परंतु येथे देखील युवकांनी आपल्या कल्पकतेने आणि श्रमदानातून गावाच्या विकासाचे केंद्र असलेल्या प्राथमिक शाळेच्या विकासासाठी केलेल्या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
कोरोनात केलेले काम कायम स्मरणात राहील
वाकळवाडी ता. खटाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुशोभीकरण करण्यासाठी शाळेत क्वारंटाइन झालेल्या नागरिकांची चांगली मदत झाली. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना रंग व साहित्य उपलब्ध करून दिले. रंगरंगोटी केलेल्या तरूणांना त्यांच्या कामाचा मेहनताना ग्रामपंचायतीच्या वतीने देणार आहे. मात्र तरुणांनी केलेले काम निश्चित लोकांच्या स्मरणात राहील.
ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेसाठी काहीतरी करण्याची संधी कोरोनामुळे मिळाली.शिवाय वेळ सत्कर्मी लागल्याचा आनंद मिळाला आहे. क्वारंटाईन काळात ज्ञानमंदीरात चांगले काम करता आले याचे समाधान वाटले.