
दैनिक स्थैर्य | दि. १९ डिसेंबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे वीजबिल भरण्याचे जुन्या बिलावरील ‘क्यू आर’ कोड ३१ डिसेंबर २०२४ रोजी रद्द होणार असल्याने जुन्या बिलावरील ‘क्यू आर’ कोडचा वापर करून भरण्यात येणारे वीजबिल जमा होणार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी जुन्या बिलावरील ‘क्यू आर’ कोड वापरून वीजबिल भरू नये, असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.
जर वीज ग्राहकांनी जुना ‘क्यू आर’ कोड वापरून वीज बिल भरले आणि ते जमा झाले नाही तर त्यास महावितरण जबाबदार राहणार नाही, असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.