दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२२ । सातारा । येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालय व विवेक प्रकाशन यांचेवतीने नुकताच ज्येष्ठ विचारवंत व संविधानाचे अभ्यासक श्री रमेश पतंगे लिखित आपले संविधान तत्वविचार, मूल्यव्यवस्था व ध्येयवाद या पुस्तकाचे प्रकाशन साताऱ्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अँड.एम डी खटावकर व सुप्रसिद्ध पत्रकार व कीर्तनकार श्री दीपक जेवणे यांचे हस्ते संपन्न झाला. दीपप्रज्वलन व भारतमाता तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.नगरवाचनालयाचे अध्यक्ष श्री अजित कुबेर व विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल पाठारे यांचे हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. विवेकच्या पुस्तक विभाग प्रमुख सौ शीतल खोत यांनी विवेक प्रकाशनविषयी तसेच आपले संविधान या पुस्तकाविषयी माहिती दिली. प्रमुख वक्ते श्री दिपक जेवणे यांनी अमेरिकन व भारतीय संविधानाचा तौलनिक विचार मांडून संविधान साक्षरतेची आवश्यकता विशद केली. प्रमुख पाहुणे अँड.महादेव खटावकर यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांइतकीच नागरिकांना कर्तव्याबाबतही जाणीवजागृती असणे अत्यावश्यक आहे,असे प्रतिपादन केले. विवेकचे सातारा प्रतिनिधी गिरीश बोंद्रे यांनी आभार मानले. सौ वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नगरवाचनालयाचे संचालक मंडळातील सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.