दैनिक स्थैर्य । दि. ९ मे २०२२ । मुंबई । ९ युनिकॉर्न्स या भारताच्या आघाडीच्या अर्ली टू ग्रोथ टप्प्यातील एक्सलरेटर फंडने आपल्या पहिल्या फंडच्या पाचव्या क्लोजरची घोषणा १०० दशलक्ष डॉलर्सला केली आहे. या फंडने आतापर्यंत ११० पेक्षा अधिक आयडिया आणि उत्पादन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली असून त्यासोबत काही ग्रोथ स्टेजवरील- सीरिज सी कंपन्या जसे वेदांतू, शिपरॉकेट, शॉपकिराणा अशा कंपन्यांचाही समावेश आहे.
या फंडची सुरूवात ५० दशलक्ष डॉलर्सच्या एकूण आकारमानासह २०२० च्या शेवटी झाली होती. भारतीय स्टार्टअप वातावरणातील एकूणच सकारात्मक वातावरण आणि फंडच्या सध्याच्या पोर्टफोलिओ कामगिरीमुळे ९ युनिकॉर्न्सला आतापर्यंत दुप्पट म्हणजे १०० दशलक्षपर्यंत कामगिरी करता आली आहे.
एक्सलरेटर फंडने आतापर्यंत ११० पेक्षा अधिक डील्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची योजना आयडिया स्टेजवर ५०० हजार डॉलर्स ते १० लाख डॉलर्सची गुंतवणूक करण्याची असून त्याचबरोबर जास्त वाढीच्या टप्प्यातील सीरिज सी आणि त्यावरील स्टार्टअप्समध्ये २० लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. या फंडने वेदांतू, मेलोरा, शिपरॉकेट, रेश्मामंडी, ब्लूस्मार्ट, आयजीपी.कॉम, फार्म्स, इनस्टोरीड आणि गोक्यू२ अशा विविध स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी डीपटेक, एंटरप्राझइ सास, वेब ३.०, फिनटेक, मीडिया, इन्शुअर टेक, हेल्थ टेक, एज्युटेक आणि डी२सी स्टार्टअप्सवर भर देत आहे.
९युनिकॉर्न्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले की, “आमच्या संकल्पनेच्या टप्प्यातील वित्तपुरवठ्याची संकल्पना बदलण्याबाबतच्या दृष्टीकोनावर अनेक आघाडीच्या एलपी विश्वास ठेवत असल्यामुळे आम्हाला फंडचे आकारमान वाढवणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर मागील वर्ष वित्तपुरवठ्याचा वेग वाढल्यामुळे स्टार्टअप्स वातावरणासाठी सर्वोत्तम कालावधी होता. आम्ही २०२१ मध्ये १०१ डील्समध्ये गुंतवणूक केली असून यावर्षी रक्कम दुप्पट करण्याच्या प्रयत्नात आहोत. आम्ही पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत फंडचे कार्य पूर्ण करणार आहोत. त्यानंतर आम्ही आमच्या दुसऱ्या फंडच्या अनावरणाचा विचार करत आहोत.”