विधिमंडळाच्या कामकाजाला ‘वंदे मातरम्’ने सुरुवात


दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२२ । नागपूर । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज ‘वंदे मातरम्’ ने सुरुवात झाली.

यावेळी विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विधानसभेतील मान्यवर सदस्य उपस्थित होते. तर विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!