
स्थैर्य, सातारा, दि. 11 सप्टेंबर : सातारा शहर परिसरात पक्ष पंधरवडा अर्थात महालय श्राद्ध पक्षाला सुरुवात झाली. घरोघरी आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे गतदिनाची तिथी ही पूजा, भोजन आणि श्राद्धकर्म करून साजरी केले जाते. यासाठी विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या यांना मोठी मागणी असते. त्यामुळे सातारा शहरातील राजवाडा परिसरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह भाजी मंडई मध्ये सध्या पालेभाज्यांचे भाव तर गगनाला भिडले आहेत. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)