
स्थैर्य, औंध, दि.०६: औंधसह परिसरात जोरदार सकाळपासून प्रचंड उष्णतेमुळे व उकाडयामुळे औंधवासिय त्रस्त झाले होते मात्र गुरुवारी दुपारी वादळी वार्यासह झालेल्या पावसाने औंधसह परिसररात पाऊस पडला तर वाकळवाडी येथे सायंकाळी झालेल्या वादळी वार्यामुळे झाड अंगावर पडून एका म्हैशीचा दुर्दैवी मूत्यू झाला.
सकाळपासून प्रचंड उन्ह व ढगाळ वातावरण यामुळे औंध परिसरात तापमानात कमालीची वाढ झाली होती. उकाडा व उन्हाच्या तडाख्यामुळे औंधकरवासियांच्या जीवाची काहिली झाली होती.
दुपारी वीजांचा कडकडाटासह धुव्वाधार पावसाने सुरुवात केली.सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस पडला .यावेळी नाले रस्त्यांंवरून खळखळून पाणी वाहिले.
कोरोनामुळे लाँकडाऊन असल्याने अनेकांनी घरात बसून, गच्चीवरती जाऊन पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.दरम्यान औंधसह,वरुड, पळशी,गोपूज, गोसाव्याची वाडी व अन्य भागात ही पावसाने हजेरी लावली .