खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते ‘दौरा’ शॉर्ट फिल्मचा प्रिमीयर सोहळा संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । फलटण । पुणे येथे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे हस्ते गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत ‘दौरा’ शॉर्ट फिल्मचा प्रिमीयर सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ वेबसिरीजचे 1 मिलियन सब्सक्रायबर व 20 कोटी व्ह्यूव्ज पूर्ण झालेबद्दल त्यांनी 1 मिलियन चा केक कापून भरभरून कौतुक करून डॉ.अमोल काल्हे यांनी सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ या वेबसिरीजचे मुख्य कलाकार तथा निर्माते सुभाष मदने, दिग्दर्शक रामदास जगताप, भरत शिंदे यांच्यासह गावरान फिल्मस् प्रोडक्शनचे सहकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!